उघड्या डोळ्यांसमोरपसरलाय क्षितिजापर्यंतजगण्याचा बेहिशोबी तपशील...चिवचिवतोयआपापल्या पट्टीतभाषेच्या आरोह-अवरोहातकोंबून सगळे स्वरसगळी व्यंजनं-लुकलुकतोयअमाप आकारांमधेअनाम रंगांमधेअवकाशातलीआपापली जागा अडवत-काळाचं बोट धरूनगतीचं आपापलं परिमाण पकडतअखंड सरकतोय माझ्यासहजगण्याचा बेहिशोबी तपशीलउघड्या डोळ्यांसमोर..!***
Thursday, 31 December 2015
उघड्या डोळ्यांसमोर...
Wednesday, 30 December 2015
तसं उगवता येईल मग...
प्रत्येक सूर्यास्तानंतरच्यापहिल्या प्रहरातविसर्जीत करता येईल काप्रत्येक दिवसाचा जन्मसंपूर्ण कोलाहलासह..?वसंतऋतूच्या प्रत्येक पहाटेजन्मतो नवा बहरत्याच वृक्षावरतसं उगवता येईल मगताजेपणानंआपल्याच जुन्या बुंध्यातूनउत्तर-रात्रीच्या शेवटच्या प्रहरातप्रत्येक सूर्योदयाबरोबर..!***
Tuesday, 22 December 2015
निमूट धारण करत राहते
फुलांचा हारनिसरडी फरशीकाढून ठेवलेल्या चपला.. बूटमुळारंभापासून दुरावलेले स्वरपोक काढून पुटपुटत बसलेले,मान झुकवून हात एकसारखे छातीशी नेतगरागरा प्रदक्षिणा घालणारेस्वतःपासून विभक्त झालेले भक्त...सळसळणारा पिंपळगोंगाट करणारी लेकरं कुणाकुणाचीभरधाव ट्रॅफिक आणिप्रदूषण सर्व प्रकारचं...कोर्या अवकाशालाइथे-आत्ताचे असे असंख्य तडे...अनावर आक्रमणं सतत चहुकडूनइतिहास-भुगोलाकडूनअनंत वाटा.. क्षितिज.. आकाशगंगांकडूनभाषेकडून... उद्दीपीत भावनांकडूनपर्वत-शिखरं.. दर्या.. समुद्रांकडूनआणि ये-जा करणार्या संपूर्ण जीव-सृष्टीकडूनतरीएखादे उत्कट लॅंडस्केप आपल्यावर उमटू देणार्यातटस्थ कॅनव्हाससारखेचौकट नसलेले असीम अवकाशनिमूट धारण करत राहतेयच्चयावत् आवक-जावक..!***
की तडजोड..?
जे जमिनीच्या वर दिसतंबहरतं... पानगळ भोगतं..पुन्हा बहरतं..फिरत राहतं ऋतुचक्रामधेते झाड..ही सरळ समजूतआता तपासून पाहायला झालीयत्रिमितींमधे काळाची चौथी मितीजमा झालीय केव्हाचहळूहळू नव्या मितीनावं माहीत नाहीत अशाबदलवून टाकतायतसगळ्या गणितांची सूत्रं आणिसुसंगतीविषयीच्याअंगवळणी पडलेल्या कल्पना..!निराधार होतायत जगण्याचे रूढ आधारमेंदुतल्या पेशी गोंधळतायत.. थकतायतपाहतांना भेसळ फुलांच्या रंगांमधलीऋतुंमधली... भाषांमधलीइझम्सच्या अनुसरणांमधलीसंस्कृतींमधली.. कार्यक्षेत्रांमधलीसंकल्पनांमधली...हे अटळ परिवर्तन की निव्वळ तडजोडअस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली?कुठे घेऊन चाललायहा नव्या युगाच्या अनाकलनीयतेचा झंझावात?***
Sunday, 20 December 2015
पाऊस असा यावा की
पाऊस असा यावा कीमनमेघ मोकळा व्हावाअन विजा काडाडुन जाताधगधगता ऊर निवावापाऊस असा यावा कीमनभुई चिंब निथळावीवार्याच्या पदरामधुनीबीजांची माळ गळावीपाऊस असा यावा कीमनबीज तरारुन यावेकोवळ्या उन्हाच्या प्रहरीहलकेच फूल उमलावेपाऊस असा यावा कीमनमोर नाचरा व्हावाहिरमुसल्या आकाशालानीलिमा पुन्हा गवसावा..!***
Friday, 18 December 2015
कुठून तरी कुठे तरी
कुठून तरी कुठे तरी एकसारखीनिमूट धावतेय मुंबईतली गर्दी...केव्हाही काहीही होईलअशी मनाची तयारी असलेलीस्वस्थता आहे तिच्या गतीलाएक लय आहे आनाकलनीय झिंग असलेलीप्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंचवापरून वापरूनजुनं मोडकळीला आल्यासारखंतरी मेकअप करून चालू पडलेलं...जागोजाग मोठमोठी होर्डींग्जराज्यकर्त्यांच्या हसर्या चेहर्यांचीकुठेही कशीही सांडलेली.. वाहणारी त्यांची जनता..तिनं काय करावं या चेहर्यांचं?त्यांनी काय करावंया बेढब वाढलेल्या जनतेचं?प्रत्येक प्रश्नापुढे हतबलतेचा पूर्णविराम !अशा जगण्याची लाज वाटायलाहीउसंत नाही कोणाला !माहीत नसलेली वेळ फीड केलेल्याटाईमबॉम्बसच्या रस्त्यावरूनधावतायत सगळी...त्याची टिक टिक ऐकू येऊ नये म्हणूनढोल वाजवतायत जीव खाऊनफटाक्यांच्या माळा फोडतायतलाऊडस्पीकर्सच्या भिंती उभ्या करूनबेसूर गाणी आदळवतायतकेविलवाण्या छात्यांवरकुणाला काही दिसू नयेम्हणून रोषणाई करतायत जागोजागबधीर होत चाललेल्या मनांवरप्रदूषणांचा वज्रलेप लावतायत..!क्षितिजाला तडा जाईलअसा आक्रोश करावा म्हणूनबेंबीच्या देठापासून उसळलेला आवेश ओसरतोयकपाळावर आठी उमटवून जेमतेमअशा आठ्यांचे खांब दुभंगूनकधी प्रकटतील माणसामाणसातले नरसींह?***
Thursday, 17 December 2015
स्वप्नसमाधी
झाडांच्या बुंध्यात... फांद्यात..टांगलेले असतात झोकेजागोजाग...पुरेशा अवकाशाचीवाट पाहत असतातगाढ मौनात !अचानक घालू नका घावबुंध्यांवर.. फांद्यांवरआतल्या झोक्यांवरझुलत असतील स्वप्नंरस रंग गंधाची...दंग असतील स्वतःतअनिमिष !उद्ध्वस्त करू नकाती स्वप्नसमाधी..!***
Wednesday, 16 December 2015
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हाअळी होतं तन.. मनवळवळत राहतंआपल्या कोषातघुसमट अनावर होण्याच्या क्षणाचीवाट पाहत !तो क्षण आला कीनिकरानं भिडते अळीआपल्या कोषालातो फाडून काढण्याच्या झटापटीचेहोतात पंखआणिपुन्हा फुलपाखरू होतं तन.. मनअळीचे पुनर्मृत्युफुलपाखराचे पुनर्जन्म...एक ऋतुचक्रफिरत असतं आतल्या आतआव्याहत...!***
Tuesday, 15 December 2015
परंतू
चांदणी दिसता अचानकवेदनेचे फूल होतेगाढ अंधारात निजल्याअक्षरांना जाग येतेवाटते होईल गाणेधुमसणार्या संभ्रमांचेवाटते येईल हातीताट भरले उत्तरांचेदुमडलेले प्रश्न सारेवाट होउन साद देतीहात सुटता जीवनाचायेउनी हातात देतीचांदणी विझते परंतूरोजच्या सूर्योदयालाविकलतेचे ऊन पुन्हापरतुनी येते घराला !***
Monday, 14 December 2015
तो देखणा भारव्दाज..
तुम्ही या छायाचित्रातल्याखराटा झालेल्या वाळक्या झाडाकडे पाहू नकामाहितीय दर पावसाळ्यातते न्हाऊन निघतं नखशिखान्ततरी ते तसंच राहिलंयजराही न बहरता..या मधोमध दिसणार्यारिकाम्या दगडाकडे मला तुमचं लक्ष वेधायचंयत्यावर एक देखणा भारव्दाज होतामागं झाडांच्या रांगा दूरपर्यंतमधे मधे रिकामं सुटलेलं अवकाशभोवती भिजलेली हिरवळ.. लाल जमीन..अलिकडे एक छोटासा धबधबाखाली जलाशय...माझ्या बाजूनं हे दृश्य अनुभवता अनुभवताते चौकटीत बंदिस्त करायला सरसावले हातघाईघाईनं टिपलं ते दृश्य...झाडांच्या रांगा.. सर्वत्र विखुरलेलं अवकाशहिरवळ.. वाळलेलं झाड.. जलाशय..जमीन आणि तो दगड..सगळं टिपलं गेलंदेखणा भारव्दाज तेवढा निसटला चौकटीतून...पण शब्दांतून शब्दांपलिकडे पाहायची सवय असेलतर दिसेल तुम्हाला तो देखणा भारव्दाजत्या दगडाच्या बाजूने जातानाकिंवा झाडांच्या रांगांमधे झेपावतानाकिंवा जलाशयात डोकावतानानक्की दिसेल कुठेतरी...नजरेनं टिपलेल्या दृश्यातूनअदृश्य नाही होता येणार त्याला...!***
Subscribe to:
Posts (Atom)