कोणत्याही क्षणीपायांखाली दरड कोसळेलतळ न दिसणार्या खालच्या दरीत-कोणत्याही क्षणीढगफुटी होईलथिजलेले रस्ते वाहू लागतीलपाण्याच्या लोंढ्याबरोबर-कोणत्याही क्षणीकर्फ्यू पुकारला जाईलबंद होतील रस्ते.. दुकानंदहशत पसरवली जाईल-कोणत्याही क्षणीस्थगित होईल अमरनाथची यात्रायातल्या कोणत्याही कारणास्तव..!तरी नेमेची येणार्यापानगळीकडे पाहावंसहज स्वीकाराच्या नजरेनंतशा सर्व दहशती झेलतप्रस्थान ठेवतात तेअमरनाथच्या यात्रेलादेहावर तुळशीपत्र ठेवून...स्थगित झालीच यात्रातर थांबून राहतात बेमुदत प्रतिक्षेत...वाटेत कोसळतात काही दरीत...काही मारले जातात गोळीबारातकिंवा अपघातात...पणअसंख्य प्रकारचे असंख्य घाव सोसतअमरनाथाचं दर्शन घेऊनपरतात सुखरूप बरेचजणसर्व दहशतींना पराभूत करतअमरनाथ पावल्याच्या समाधानात...दर क्षणीकसोटी पाहणार्याया खडतर प्रवासातघडत असेल का समांतरपणेआंतरिक-यात्राहीआतल्या माणसाला उन्नत करणारी ?***
Friday, 1 January 2016
यात्रा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment