Wednesday, 27 January 2016

संदिग्ध रंग

आयुष्य उणावत गेले
पण सळसळ उरली पानी
गाणारे दूर उडाले
घरट्यात राहिली गाणी

रस्त्याला कळले नाही
कोणते गाव टोकाशी
उमटला अनाहुत शब्द
पण अकल्पीत वळणाशी

अव्यक्त विदेही इच्छा
देहाचे कवच गळाले
संभ्रमीत झाली माती
बुंध्यातील तम डुचमळले

मधलाच प्रहर दिवसाचा
संदिग्ध रंग आकाशी
भय निराधार गाभ्यात
अडखळे वाट पायाशी !

***

No comments:

Post a Comment