Friday, 15 January 2016

निर्गुण आठवण

सरसरुनी उसळे देही
निर्गूण आठवण ओली
आनंद-व्यथेचा गुंता
खालीच ठेवुनी आली

शिल्पात वादळी वाटा
अखलेल्या नव्हत्या तरिही
ती शोधत आली पुरती
सगुणाच्या काठावरती

बोलली मुक्त हासून
रुणझुणली शब्दांमधुनी
शिंपून भोवती गंध
गुणगुणली स्पर्शामधुनी

रसरंग साजरे झाले
निर्गुणात विरुनी गेले
व्यक्ताच्या खेळामधुनी
सगुणाचे भिडू परतले!

***

No comments:

Post a Comment