आत्मचरित्र लिहावं असं मला वाटत नाहीपण कुणी विचारलंचआमच्यातल्या नात्याबद्दलतर समोर ठेवता येईल एखादी कविताटीनेजमधे ऐकलेल्या, भावलेल्याआणि नंतरअनुभवाच्या आसपास रेंगाळणार्याचित्रपट गीतांना स्मरून...‘ तुम गगन के चंद्रमा होमैं धरा की धूल हूँ ’असं मी त्यांना कधी म्हटलेलं नाही‘ तुम हो सागर, मैं किनारातुम क्षमा मैं भूल हूँ..’असं तेही मला कधी म्हणत नाहीतपण आमच्यातल्या नात्याबद्दलकुणी विचारलंचतर सांगता येईलकाहिशा याच शैलीत...उदाहरणार्थ-तो काही उणे काही अधिकपण माणूस सर्वाधिकमी त्याच्यासाठी बालककारण तो पूर्ण पालकमी ओसंडणारे चित्रतो पेलणारा कॅनव्हासमी सत्यवान तो सावित्रीतो सुकाणू मी नावमी काविता तो शब्दमी शब्द तो अर्थमी ओघळणारे मोतीतो बांधणारे सूत्र..एका अनावर अव्यवहाराचीसात्विक व्यवहाराशी सांगडतो कदाचित् शिल्पकारमी प्रामाणिक दगड‘तुझं-माझं’ नाही, त्याचा‘आपलं’ म्हणण्यावर भरतो झाडाची भूमीगत मुळंमी वर मिरवणारा बहरमाझ्या प्रत्येक नाही-नकोलात्याचा कृतीशील होकारमी आत-आतला केंद्रबिंदूतो परीघाचा विस्तार...हा खेळ नाहीय शैलीदार शब्दांचामला अभिप्रेत आहेप्रत्येक शब्दातले संपूर्ण सूचन...मी वादळाच्या अनुवंशातगटांगळ्या खातानाघाबरून उद्ध्वस्ततेलाहात उंचावला आधारासाठीतेव्हा मला किनार्याशीसुखरूप नेणारा हात त्यांचा होताया सुखरूपातलं सुख भोगतानावाटतं कधी कधीमी बचावले वाताहतीच्या शक्यतेतून,स्थिरावले, सुखवस्तू झालेपण दुरावले कदाचित्निराधाराच्या ओंजळीतल्याखडतर दानालाजे पेलतानापोळतात हात... किंवा जळावंच लागतं सरळजे मिरवण्यासाठीलागते रणांगणावरल्या योद्ध्याची विजीगिषाअग्निदिव्याच्या कसालाउतरता येत नाही बहुतेकांनाचोख सोनं असल्याशिवाय...!आंतरिक ऊर्मीनं कृतिशील राहण्याच्यासहज वृत्तीतूनत्यांनी मला किनार्यावर आणलं,दिला नवा जन्म आणिस्वतःच्या पुण्याईच्या शिदोरीसोबतमाझ्या सुखरूप हातात ठेवला शब्दतो प्रसवत राहिला कविताजगण्यातल्या समजुतींच्यापूर्वजन्मातल्या निद्रिस्त घुसमटीच्याजाणीव विस्तारणार्यास्वतःला तपासणार्यामिळवलेलं शहाणपणजगण्यात उतरवण्याचा आकांत करणार्यान मागितलेलं दान देत राहणार्या...मी कविता तो शब्दमी शब्द तो अर्थमी अर्थ तो सार्थ..!***
Saturday, 2 January 2016
सहजीवनातल्या नात्याबद्दल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment