Saturday, 30 January 2016

पेनात शाई आहे

पेनात शाई आहे
शब्द नाहीत
शाई संपली तर भरता येईल
शब्द नाहीत

तरी पेन कागदावर टेकलेलं
निराकारात वाकलेलं
आशेनं..

की
शब्द कागदातून उगवतील
हवेतून ओघळतील
मनातून निथळतील
डोळ्यातून टपटपतील...

***

No comments:

Post a Comment