Sunday 10 January 2016

अधांतरी आकांत

अरण्यातली
रात्र दिशाहिन
तशात
भणभण वारा
अंधाराची
सोबत बहिरी
तुफान
पाऊसधारा !

अंधच सारी
झाडे झुडुपे
मुकी
पशू, पाखरे
ऊग्र भयाची
दहशत भिजकी
मिणमिण
उदास तारे !

तरी चालणे
भागच पडते
पाय
रुते खोलात
आधाराला
नभ ना भूमी
अधांतरी
आकांत !

***

No comments:

Post a Comment