Saturday 30 January 2016

पाण्याचा डोह

पाण्याचा डोह
काठावर झुडुपं
झुडुपांवर तुरे
तुर्‍यांखाली खडक
खडकावर पाखरू
एवढुसं

लांब निळ्या चोचीचं
डोकावतंय डोहात
शोधतंय आईला
किंवा काहीतरी खायला

बसलंय निवांत
कुणी नाहीसं बघून
सावध डोळे
इकडे तिकडे
कुणीच नाही
वाटतं त्याला

सहज खाली मान
पाण्यात हालचाल
कुणीतरी आहे..
पंख सावध झाले
पाखरू उडून गेले..!

***

No comments:

Post a Comment