Thursday 28 January 2016

पण ते त्यांना कळलं नाही

‘जीन्स’मधली
साठीची एक तरुणी
‘पंजाबी’मधल्या
सत्तरीच्या प्रौढेला म्हणाली
पहाना
उन्मळून पडलेल्या
या झाडाचा बुंधा
कापून टाकलाय पुरता
तरी
जमीनीत रुतून राहिलेल्या
उरल्यासुरल्या मुळांच्या आधारानं
कसं तरारलंय झाड पुन्हा...

व्हिटॅमिन्सची गोळी चघळत
प्रौढा उदगारली
हं ! कुणी मरायला तयार नाही !

बुंध्यातून उगवलेल्या फांद्या
त्यांना हसत होत्या
पण ते त्यांना कळलं नाही !  

***

No comments:

Post a Comment