Monday 18 January 2016

तेज कधी ना लपते

उगवताच सूर्याला अवचित
पूर्ण ग्रहण लागले
बघता बघता आडोशातुन
तेज मोकळे झाले

निमिषभराचे ग्रहण झेलुनी
पक्षी उडून गेले
तिमिराचे ते मृगजळ होते
वृक्षांनाही कळले

कुणीहि येवो आड कसेही
तेज कधी ना लपते
दृष्टी आपली अवसेच्याही
पल्याड ना पाहते

तळपत असते अखंड निर्मम
सूर्यबिंब आकाशी
उदयास्ताचा खेळ चालतो
मनातल्या क्षितिजाशी.!

***

No comments:

Post a Comment