Thursday 28 January 2016

तो केव्हापासुन आहे

विक्राळ भोवती लाटा
तो खडक उभा मध्यात
ध्यानस्थ मौन थिजलेले
वादळातही निद्रिस्त

किति बोटी आल्या गेल्या
खडकाला कळले नाही
बोटीतिल कोणालाही
खडकाची चाहुल नाही

उगवतो सूर्य पूर्वेला
खडकावर येते ऊन
तो उजेडातही काळा
कोरडा जळात असून

तो केव्हापासुन आहे
अन असाच तो असणार
प्रलयाला सुद्धा नाही
तो असा तसा कळणार !

***

No comments:

Post a Comment