Friday 15 January 2016

कुठून येतो पक्षी येथे

कुठून येतो पक्षी येथे
कुठे उडुन तो जातो
जाता जाता चोचीमधले
दाणे विखरून देतो

वार्‍यालाही दिशा न माहित
कुठे कसाही फिरतो
येता जाता इकडुन तिकडे
दाणे शिंपित जातो

कुठे ओंजळी भरलेल्या तर
कुठे रिकाम्या असती
दाण्यांना ना कळते काही
कुठे कितीही पडती

उगवुन येते भलते काही
नकोच जे कोणाला
क्षुधा उपाशी मूक राहते
कळते ना पक्षाला !

***

No comments:

Post a Comment