Thursday 28 January 2016

कस्तुरी

आपुल्या मधली कस्तुरी
शोधत हिंडे रानभरी
व्यर्थच उसाभर सारी
करतसे

सुगंध सांगे नाकाला
नाक सांगे बुद्धीला
बुद्धी सांगे मनाला
धाव बाबा

केव्हापासून हे धावणे
असे सैरभैर होणे
आणि विवरात हरवणे
चालू आहे

विसरुन गेले पाय
त्याना शोधायचे काय
तरी करीत हाय हाय
धावतात

प्रवासाविना नुसतीच गती
गुंतविते सार्‍यांची मती
तरी कोणा काही उपरती
होत नाही !

***

No comments:

Post a Comment