Thursday 28 January 2016

जुनी याचना

उदास होती
हवा मघाशी
क्षणात पडले
ऊन

घुसमटलेल्या
मौनामधुनी
अलगद उतरे
धून

इंद्रधनू
उमटावे तैसी
दरवळली
प्रार्थना

वादळ वारे
मिटून झाली
तृप्त जुनी
याचना !

***

No comments:

Post a Comment