Sunday 17 January 2016

ही स्वस्थता नाही काही

जंगल सुनसान आहे खुशाल
जरी ते जंगल आहे

पापण्यांखाली शांत पडून आहे रात्र
तिला उठावसं वाटत नाहीय

आकाश काळवंडलेलं आहे निवांत
त्याच्यापर्यंत पोचत नाहीय
मातीची आच...

ही स्वस्थता नाही काही
जंगल, आकाश आणि रात्रीला आलेला
मख्ख थकवा आहे हा..!

***

No comments:

Post a Comment