Tuesday 5 January 2016

कुठे कळते त्याना तरी...


हे अगदिच खरं आहे
की कळत नाही मला
विश्वाचा विराट विस्तार
समुद्राची अथांग गाज
अणूगर्भातलं सूक्ष्मतम रहस्य
किंवा सूर्याच्या गाभार्‍यातली आग...

पण त्यांना तरी
कुठं कळतं
माझ्या मनाचं
दशदिशा घरंगळत राहणं
आणि रोज पराभूत होऊन परतणं?

माझ्या पेशींच्या
अनिश्चित वर्तनाचं गूढ
किंवा आतल्या नसांमधे
निमुट पसरलेल्या वेदनेची धग
कुठे कळते त्याना तरी?...

***

No comments:

Post a Comment